Home » लता मंगेशकर यांची प्रकृती चिंताजनक, पुन्हा व्हेंटिलेटरवर

लता मंगेशकर यांची प्रकृती चिंताजनक, पुन्हा व्हेंटिलेटरवर

by नाशिक तक
0 comment

मुंबई । प्रतिनिधी

लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली असून त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले आहे. यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या भेटीला गेले आहेत.

लता मंगेशकर यांना जानेवारीत कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आले होते. दरम्यान आता पुन्हा लता मंगेशकर यांची प्रकृती बिघडली असून त्यांना व्हेंटिलेटरवर घेण्यात आले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल झाले आहेत.

यावेळी डॉ. प्रतिमा समदानी यांनी त्यांच्या तब्येतीबाबत अधिक माहितीही दिली होती. ‘दीदींच्या प्रकृतीत सुधारणा होत असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. त्या लवकर बऱ्या होऊन स्वघरी जाव्यात अशी आमची इच्छा आहे.’

मध्यंतरी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती, त्यानंतर त्यांचे व्हेंटिलेटर काढण्यात आले होते. लता मंगेशकर यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!