नाशिक पोलीस आयुक्त व शिवसैनिकांमध्ये ‘तू तू मै मै’

नाशिक । प्रतिनिधी

नाशिकमधील शिवसेनेचे पदाधिकारी नाशिक पोलीस आयुक्तांच्या भेटीला गेले असता यावेळी यांच्यात तू तू मै मै झाली. तर पोलीस आयुक्तांनी शिवसैनिकांना भेटण्याचे देखील यावेळी टाळले.

भाजप कार्यालय हल्ला प्रकरणी नगरसेवक दिपक दातीर आणि सेनेचे पदाधिकारी बाळा दराडे यांना ४ फेब्रुवारी रोजी पोलीसांनी तडीपारीची नोटीस बजावली होती. त्याच पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे संपर्क प्रमुखांसह सर्व नगरसेवक पोलीस आयुक्तांच्या भेटीला गेले होते. मात्र पोलीस आयुक्तांना भेटायला गेलेल्या शिवसैनिकांशी भेट करण्याचं त्यांनी टाळल्याचे दिसून आले.

दरम्यान सेना पदाधिकारी आणि पोलीस आयुक्तांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सुधाकर बडगुजर, अजय बोरस्ते हे उपस्थित होते. यावेळी पोलीस आयुक्तांच्या दालना बाहेरच शिवसैनिक आणि पोलीस आयुक्तांमध्ये बाचाबाची झाल्याचं समजते आहे.

मात्र बाचाबाची का झाली, याबाबत मात्र समजू शकले नाही. या संपूर्ण घटनेनंतर पोलीस आयुक्त दीपक पांडे हे सेना शिष्टमंडळाला भेट न देताच निघून गेले.