मनपा निवडणुकीला दहा उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी लागणार!

नाशिक । प्रतिनिधी

प्रभाग रचना जाहीर झाल्यापासून एक प्रकारे नाशिक महापालिकांच्या बिगुल वाजला असून, राजकीय पक्ष, इच्छुकांसह मनपा प्रशासनही प्रशासकीय पातळीवर तयारी करत आहे. त्या दृष्टीने प्रशासनाचे नियोजन सुरु असून, या निवडणुकीला दहा उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी लागणार असल्याचे माहिती समजते आहे.

गेल्या पंचवार्षिकामध्ये अर्थात २०१७ मध्ये झालेल्या नाशिक महापालिकेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत शहरात ३१ प्रभाग होते. तर यंदा ४४ प्रभाग होणार आहेत. सध्या असलेल्या १२२ नगरसेवकांच्या संख्येत ११ नगरसेवकांची भर पडणार असून निवडणूक झाल्यांवर सभागृहात एकूण १३३ सदस्य दिसणार आहेत. यंदा त्रिसदस्यीय प्रभाग रचना करण्यात राहणार आहे. यामुळे उपजिल्हाधिकारी दर्जाचे एकूण दहा निकवडणूक अधिकारी लागणार आहेत.

एका निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सुमारे चार प्रभागांची जबाबदारी राहणार असल्याची माहिती आहे. २०१७ साली निवडणुकीत एका निवडणूक अधिकाऱ्याकडे तीन प्रभागांची जबाबदारी होती. एका प्रभागात त्यावेळी चार सदस्य होते. यामुळे तीन प्रभागांसाठी एक अधिकारी होता, तर यंदा एका अधिकाऱ्याकडे चार प्रभाग राहणार आहेत.

निवडणूक आयोगाच्या सूचनेननुसार महापालिका प्रशासन याबाबत पत्रव्यवहार करून कार्यवाही करणार आहे. सध्या निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ०१ फेब्रुवारी रोजी महापालिकेची प्रारूप प्रभागरचना जाहीर झाली असून सध्या त्याच्यावर हरकती मागविण्यात येत आहेत. मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत शहरात एकूण दहा लाख ७३ हजारांपेक्षा जास्त मतदार संख्या वाढणार आहे.