सोन्याचा तुकडा देतो म्हणत चोरट्यांनी दिल्या हातावर तुरी!

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक -पुणे बस स्थानकाजवळ एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरून अज्ञात चोरट्यांनी पोबारा केला आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलीस सुरक्षिततेबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

नाशिक शहरात सोनसाखळी चोरीच्या घटनांना ऊत आला आहे. दिवसाढवळ्या सोन साखळी चोरीचे प्रमाण वाढले आहे. शहरातील नाशिक-पुणे महामार्गालगत असलेल्या बस स्थानकात महिला बसलेली होती. यावेळी काही अज्ञात तरुण तिच्याजवळ आले. आणि म्हणाला कि, सोन्याचा तुकडा देतो, तू आम्हाला मंगळसूत्र दे,अस सांगितले. महिलेने देखील मंगळसूत्र काढून त्यांच्याकडे दिले. या चोरांनी तिच्या हातावर पितळाचा तुकडा ठेवत मंगळसूत्र घेऊन चोरट्यानी पोबारा केला. त्यानंतर महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

निर्मला पाटील असे या महिलेचे नाव आहे. पाटील यांच्याशी गोड बोलून चोरट्यानी फसवणूक केली आणि पलायन केले. अज्ञातां विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे सातत्याने होणाऱ्या चैन स्नॅचिंग च्या घटनांना आळा कधी बसणार असा सवाल उपस्थित होत आहे.

शहरातील सिडको, नाशिकरोड, अंबड, नवीन नाशिक, सातपूर आदी परिसरात सोन्याचे दागिने चोरीला जाण्याच्या घटनांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. या चोऱ्या रोखण्यात पोलिसांना अपयश येत असून, या नवीन घटनेनंतर मात्र, या स्थानिकांमधून टोळक्याला पकडण्याची मागणी जोर धरत आहे.