नाशिक । प्रतिनिधी
दिंडोरी तालुक्यातील देहरेवाडी येथील जंगलात एक दहा ते बारा वर्षीय मुलीस अज्ञात इसमाने मारण्याच्या इराद्याने फासावर लटकावण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान स्थानिक गुराख्यानी हा प्रयत्न हाणून पाडत मुलीची सुटका केली आहे.
दरम्यान दिंडोरी तालुक्यातील देहरेवाडीच्या जंगलात दुपारी अकरा ते बारा वाजेच्या सुमारास हि घटना घडली आहे. येथील काही गुराखी नेहमी प्रमाणे आपली गुरे चारत असताना जंगलात काही तरी आवाज व झटापट होत असल्याचे दिसून आले.
त्यांनी तात्काळ या परिसरात धाव घेतली असता एक इसम मुलीला फासावर लटकवत असल्याचे दिसून आले. गुराख्यानी एकत्र येत त्या व्यक्तीला हटकण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीला डोसून दाट झाडीत तो व्यक्ती पळून गेल्याचे गुराख्यानी सांगितले.
सदर गुराख्यानी मुलीला तात्काळ खाली उतरवले आणि नाशिक येथील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी हलवले. सध्या या मुलीवर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून दिंडोरी पोलिसांकडून मुलीची ओळख पटवण्याचा काम सुरू आहे. तर या प्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.