विना हेल्मेट प्रवेश नडला, महाविद्यालयांच्या प्राचार्यांवर नाशिक पोलिसांची कारवाई

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक शहरात (Nashik City) गेल्या काही दिवसांपासून नो हेल्मेट नो एन्ट्रीची (No helmet No entry) मोहीम जोरदार सुरु आहे. या पार्श्वभूमीवर महाविद्यालयात विना हेल्मेट (Without helmet) प्रवेश देणं प्राचार्यांना महागात पडले असून दोघांवर नाशिक पोलिसांनी (Nashik Police) कारवाई केली आहे.

नाशिक शहरात सध्या नो हेल्मेट नो कोऑपरेशन (No Helmet No cooperation) हि मोहीम पोलीस आयुक्त दीपक पांडेय (Police Commissioner Dipak Pandey) यांच्या मार्गदर्शखाली सुरु आहे. त्यामुळे या मोहीमेअंर्तगत संस्थेत किंवा शासकीय कार्यालयात विना हेल्मेट प्रवेश देण्यास मज्जाव आहे. असे असताना शहरातील पंचवटीतील दंत महाविद्यालय (Panchavti dental college), तसेच कॉलेज रोडवरील एचपीटी महाविद्यालयात (HPT College) विना हेल्मेट प्रवेश देत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे या महाविद्यालयांतील प्राचार्य व मालमत्ता अधिकाऱ्यांवर यासंदर्भात कारवाई कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान नाशिक वाहतूक पोलिसांनी (Nashik Traffic police) आस्थापनांमधील हेल्मेट सक्तीच्या अंमलबजावणीसाठी आता भरारी पथके नेमली आहेत. हि भरारी पथके त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत आहेत. आणि याच दरम्यान पाहणी करत असताना या दोन्ही महाविद्यालयात दुचाकीधारक विनाहेल्मेट प्रवेश करतांना दिसले. त्यामुळे स्थानिक महाविद्यालयांतील प्राचार्य व मालमत्ता अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

हेल्मेट नाही तर सहकार्य नाही, हेल्मेटसक्तीसाठी नाशिक पोलिसांची मोहीम सुरु आहे. या पार्श्वभूमीवर शासकीय कार्यालयांसह शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस, औद्योगिक परिसराच्या आवारात नो हेल्मेट नो एन्ट्री अशी मोहीम सुरु आहे. या परिसरात विना हेल्मेट दुचाकी चालकांना प्रवेश दिल्यास संबंधित मालमत्ता अधिकाऱ्यांवर कारवाई होणार करण्यात येते. यामध्ये १२०० रुपये दंड अथवा ०८ दिवसाच्या तुरुंगवासाची शिक्षा देखील सुनावण्यात येते.