लष्कर हेलिकॉप्टर दुर्घटना : चार जणांचा मृत्यू, इतर दहा जणांवर उपचार सुरु

दिल्ली । प्रतिनिधी
कर्नाटकातील उटीजवळ लष्कराच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला असून यामध्ये तीन जण जखमी आहेत. तर महत्वाचे म्हणजे सीडीएस जनरल बिपीन रावत देखील जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हवाई दलाच्या सुलूर बेसवरुन वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्विसेस कॉलेजमध्ये हे सर्व वरिष्ठ अधिकारी निघाले होते. दरम्यान दुपारी पावणे एक च्या सुमारास कर्नाटकातील कुन्नूरजवळ निलगिरी कट्टेरी ही दुर्घटना घडली. यामध्ये एकूण १४ जण प्रवास करीत होते. सदर दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून इतर १० दहा जण गंभीर जखमी असल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेची माहिती समजताच जिल्हाधिकारी आणि लष्कराचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यासह त्यांचे कुटुंबीय आणि मदतनीस होते अशी माहिती समोर येत आहे. तसेच ब्रिगेडियर एल. एस. लिडेर, लेफ्टिनेंट कर्नल हरजिंदर सिंह, एन.के. गुरसेवक सिंह, एन.के. जितेंद्र कुमार, L/NK विवेक कुमार, L/NK बी. तेजा, हवालदार सतपाल आदी या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते.

हेलिकॉप्टर कशामुळे क्रश झाले याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. दरम्यान घटनेनंतर तातडीने बचावकार्याला सुरुवात झाली आहे. मात्र डोंगर दऱ्यात हेलिकॉप्टर असल्याने बचावकार्यास अडचणी येत असल्याचे सांगण्यात येत आहे.