शनिवार, जून 3, 2023
घरताज्या बातम्यातिरंगा यात्रेसाठी निघालेले एमआयएम कार्यकर्ते माघारी

तिरंगा यात्रेसाठी निघालेले एमआयएम कार्यकर्ते माघारी

नाशिक | प्रतिनिधी

मुंबईला तिरंगा यात्रेसाठी जाणारे धुळे मालेगाव मधील एमआयएम कार्येकर्ते अखेर माघारी फिरले आहेत.

दरम्यान मुस्लीम आरक्षण आणि इतर मुद्द्यांवर खासदार इम्तियाज जलील यांनी तिरंगा यात्रेची हाक दिली होती. या हाकेला साद देत मालेगाव, धुळे आणि नाशिकमधून मोठ्या प्रमाणात एमआयएमचे कार्यकर्ते तिरंगा यात्रेला निघाले होते. मात्र पोलिसांकडून या कार्यकर्त्यांना अडवण्यात येत होते.

तिरंगा यात्रेतील अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते तर काहींना स्थानबद्ध केले होते. अखेर चार तासापासून सुरू असलेल्या बाचाबाचीनंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना माघारी जाण्यास भाग पाडले.

मुंबईच्या दिशेने जात असताना नाशिक ग्रामीण पोलिसांनी एमआयएम कार्येकर्त्याना चांदवड टोलनाक्यावर ताब्यात घेत त्यांना माघारी पाठवले आहे.

RELATED ARTICLES

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप