Video : केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवारांचा साधेपणा पुन्हा समोर, चालवले उसाचे गुऱ्हाळ

नाशिक । प्रतिनिधी

सध्या उन्हाचा तडाखा हळूहळू जाणवू लागला आहे. रस्त्याला ठिकठिकाणी उसाचे गुऱ्हाळ दिसू लागले आहेत. अशातच जिल्ह्याच्या मंत्री डॉ. भारती पवार यांचा साधेपणा पुन्हा चर्चेत आला आहे. कळवण रस्त्यावरून जात असताना त्यांनी चक्क उसाच्या गुऱ्हाळाला भेट देत उसाचा रस काढताना दिसून आल्या आहेत.

नुकतीच भाजपने चार राज्यातील निवडणुकांत घवघवीत यश संपादन केले. यानंतर नाशिकमध्ये मंत्री डॉ. भारती पवार यांच्यासह पदाधिकारी , कार्यकर्ते यांनी विजयी जल्लोष साजरा केला. दरम्यान एखादा नेता झाला कि त्याच्या डोक्यात भलती हवा जाते. त्याचे वागणं, राहणीमान बदलतं… पण राजकारणात राहूनही अशी काही माणसं असतात, ज्यांचे पाय जमिनीवर असतात, त्यांच्या वागण्या-बोलण्यात काही फरक पडत नाही. त्यातलंच एक नाव म्हणजे मंत्री डॉ. भारती पवार. मंत्री पवारांचा साधेपणा पुन्हा एकदा चर्चेचा विषय झाला आहे.

https://www.youtube.com/watch?v=dpI0ZlwBqaE

यावेळी डॉ. भारती पवारांनी कळवणच्या रस्त्यावरील एका उसाच्या गुऱ्हाळात रसाचा आस्वाद घेतला आहे. त्यांनी यावेळी चक्क उसाचं गुऱ्हाळ चालविले आहे. या संदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत दिसते आहे कि, डॉ. पवार या उसाच्या कांड्या गुऱ्हाळात टाकताना दिसत आहेत. तर हे करतेवेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झाल्याचे दिसत आहे. या व्हिडिओत ‘ व्वा व्वा , खूप छान अशी प्रतिक्रिया देखील त्या देताना दिसत आहे.

डॉ. पवार मंत्री झाल्या असताना देखील त्यांचा साधेपणाचा एक व्हिडीओ समोर आला होता. जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने भारती पवार नाशिकमध्ये आल्या होत्या. त्यावेळी देखील त्यांनी नाशिकमधील एका चहाच्या टपरीवर त्यांनी चहाचा आस्वाद घेतला होता. तसंच आपल्या सोबतच्या लोकांना देखील त्यांनी चहा वाटला होता. यावेळी देखील आपण केंद्रीय मंत्री आहोत, हे त्या विसरुन गेल्या गेल्याचे व्हिडीओवरून दिसून येते.