बारावीच्या इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत चूक, बोर्डाने म्हटले…!

नाशिक । प्रतिनिधी
बारावीच्या पहिल्या इंग्रजीमध्ये एक चुकीचा प्रश्न होता. या प्रश्नाला एक गुण दिला जाणार असल्याचे परीक्षा मंडळाने म्हटले आहे. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

तब्बल दोन वर्षानंतर काल (दि.०४) बारावीच्या परीक्षांना सुरवात झाली. यावेळी पहिलाच पेपर हा इंग्रजीचा होता. या पेपरमध्ये एक प्रश्न चुकीचा असल्याचे समोर आले होते. या एक प्रश्नाला एक गन दिला जाणारा असल्याचे परीक्षा मंडळाने जाहीर केले आहे.

दरम्यान बारावीच्या ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांक 1) A) 5 हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांना बोर्डाकडून एक गुण अधिकचा दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान याबाबत विद्यार्थ्यांनी बोर्डाकडे तक्रारी मांडल्या होत्या. बोर्डानेही ती चूक मान्य करत त्याचा एक गुण देण्याचे ठरवले आहे.

कोरोना संकटामुळे मागील दोन वर्ष शिक्षणाचे तीन-तेरा वाजले आहेत. दोन वर्ष ऑनलाईन शिक्षणामुळे अनेक विद्यार्थी पुरेशी तयारी न झाल्याने चिंतेमध्ये आहेत. मात्र बोर्डानेही कोरोना परिस्थितीचा विचार करता अभ्यासक्रम कमी करत आणि लेखी परीक्षेसाठी वाढीव वेळ देत सुरक्षित वातावरणामध्ये ऑफलाईन परीक्षा पार पाडण्यासाठी कंबर कसली आहे.