रामकुंडावर जुने घाट, मंदिरावर हातोडा, नाशिककर आक्रमक

नाशिक । प्रतिनिधी

नाशिकमध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या कामादरम्यान जुने घाट आणि काही छोटी मंदिरं पाडल्याने स्थानिक आक्रमक झालेत. नाशिकमध्ये चालू असलेल्या स्मार्ट सिटी कामांचा आधीच बोजवारा उडाला असताना आधीच अनेकदा वादात सापडलेली स्मार्ट सिटीची कामं पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत.

या आधीही स्मार्ट सिटी कामांतर्गत स्मार्ट सिटी प्रशासनाकडून ऐतिहासिक महत्त्व असलेला रामसेतू पाडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या विरोधाही नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र, आता पुन्हा एकदा या कामादरम्यान जुने घाट आणि काही छोटी मंदिर पडल्याने आता माणिक नागरिकांचा रोष पाहायला मिळतोय.

स्मार्ट सिटीच्या या कामादरम्यान काही छोटी मंदिर जुने घाट पाडल्याने स्थानिकांनी आक्रमक भूमिका घेत स्मार्ट सिटीचे सुरू असलेल कामच बंद पाडले आहेत. सोबतच स्मार्ट सिटी प्रशासन जो पर्यंत हे पाडलेले घाट जसेच्या तसे बांधून देत नाही तोपर्यंत स्मार्ट सिटीचे काम सुरू होऊ देणार नाही अशी धमकी वजा इशाराच यावेळी स्थानिक नागरिकांनी दिला आहे. त्यामुळे आता नागरिकांच्या या आक्रमक पावित्र्यावर स्मार्ट सिटी प्रशासन काय निर्णय घेईल हे पाहणं महत्त्वाचे ठरेल.