नाशिक । प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर (Corona Crisis) शाळा बंदच्या निर्णयानंतर आता कोरोना रुग्ण आढळून आल्यास बिल्डिंग सील (Buildings Seal) करण्या संदर्भात नियमावली जाहीर (New Regulations) करण्यात आली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मंदावलेल्या कोरोनाने आता पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. मुंबई (Mumbai) आणि महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा मोठी वाढ नोंदवली गेली आहे. काल मुंबईत एक हजाराच्या वर तर महाराष्ट्रात (Maharashtra) २ हजार १७२ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकाने (Mumbai BMC) कोरोना निर्बंध अधिक कठोर करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील शाळा बंद (Mumbai School Closed) ठेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यापाठोपाठ आता कोरोना रुग्ण आढळून आलेली इमारत सील करण्याबाबतही महापालिकेने नवी नियमावली जाहीर केली आहे.
कोरोना आणि ओमायक्रोन च्या (Omicron) धास्तीमुळे कालच मनपा आयुक्तांनी शाळा बंदचे आदेश दिले. त्यानंतर आता पालिकेने इमारती सील करण्याच्या निर्णयात बदल केला आहे. रहिवासी इमारतीच्या एकूण क्षमतेपैकी २० टक्के नागरिक कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आढळल्यास संपूर्ण विंग किंवा इमारत सील केली जाणार आहे. यात ज्या इमारतीत कोरोना रुग्ण आढळतील त्या इमारतीतील रहिवाशांसाठी काही नियम पालिकेने घालून दिले आहेत. या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
अशी आहे नियमावली
इमारतीच्या किंवा विंगच्या एकूण क्षमतेपैकी २० टक्के रहिवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यास संपूर्ण इमारत किंवा विंग सील करण्यात येणार.
आयसोलेट आणि होमक्वारंटाइन असणाऱ्या रुग्णांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचं काटेकोरपणे पालन करावे.
रुग्णांनी लक्षणे लक्षात आल्यापासून कमीत कमी १० दिवस आयसोलेट राहणे बंधनकारक असणार आहे.
रुग्णांच्या हायरिस्क कॉन्टॅक्टमध्ये असणाऱ्या नागरिकांनी ७ दिवस होमक्वारंटाइन व्हावे आणि पाच ते सात दिवसांच्या आत कोरोना चाचणी करून घ्यावी.
इमारतीत कोरोना रुग्ण असल्यास संबंधित रुग्ण आणि कुटुंबियांना अन्न, औषध आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा पुरवठा केला जाईल याची इमारतीच्या कमिटीने काळजी घ्यावी. पालिकेचे आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना इमारतीच्या कमिटीनं संपूर्ण सहकार्य करावे. इमारतीची सीलमधून मुक्तता करण्याचा निर्णय वॉर्ड स्तरावर घेतला जाईल.