टेन्शन वाढलं! नाशिक जिल्ह्यात दिवसभरात ‘इतक्या’ रुग्णांची नोंद

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची (Corona Patient’s) संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच आज जिल्ह्यात दिवसभरात २१६ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह ( Corona reports Positive) आले आहेत. तर दिलासादायक बाब अशी की मागील चोवीस तासात ७४ रूग्णांनी करोनावर मात केली.

जिल्हा प्रशासनास प्राप्त (Nashik Administration) अहवालानुसार मागील चोवीस तासात २१६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक (Nashik) शहरात १५१, नाशिक ग्रामीण विभागात ३६,मालेगाव ००, तर जिल्हाबाह्य २९ रुग्णांची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज ०२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून हे दोन्ही मृत्यू नाशिक मनपा हद्दीतील आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात करोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या ८ हजार ७५८ इतकी आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत कमालीची वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नाशिक प्रशासन अलर्ट असून लवकरच कडक निर्बंध लागण्याची शक्यता आहे.