महापालिकेचा २०२३-२४ अर्थसंकल्प सादर; नाशिककरांना दिलासा

नाशिक : महापालिकेचे अंदाजपत्रक आज सादर झाले आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी २४००.७५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले आहे. अंदाजपत्रकात विशेष बाब म्हणजे नाशिककरांसाठी कोणत्याही प्रकारची मालमत्ता किंवा पाणीपट्टी करात वाढ झालेली नाही.

शहरातील वाढत्या पार्किंग समस्येचा प्रश्न लक्षात घेता, शहरातील यशवंत मंडई या ठिकाणी पार्किंग होणार असून, शहरात मल्टीलेवल पार्किंग देखील प्रस्तावित करण्यात आली आहे. तसेच प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ई-व्हेईकल्सला चालना मिळणार असून, शहरातील १०६ ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याची घोषणा अंदाजपत्रकात करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे तातडीने २० ठिकाणी केंद्र सरकारच्या एन-कॅप या योजनेतून चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे. तसेच आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ‘नमामि गोदा’ प्रकल्पाला चालना देण्यात येणार असून, गोदावरीचे प्रदूषण थांबवणे आणि सौंदर्यीकरण करणे यासाठी नमामि गोदा हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा अहवाल केंद्र सरकारकडे सादर करून निधीची मागणी केली जाणार आहे.

नाशिक मधील फाळके स्मारक या ठिकाणी पर्यटन वाढीसाठी देखील प्रयत्न केले जाणार असल्याची घोषणा आयुक्तांनी केली आहे. नाशिकमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियमची उभारणी सुरू असून, या क्रिकेट स्टेडियमच्या दुसऱ्या टप्प्यातील काम येत्या अर्थसंकल्पात होणार आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाच्या दुसऱ्या टप्प्यातील देखील काम होणार असून त्यासाठी दहा कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी नाशिक महापालिकेने नववर्ष स्वागत संकल्पना तयार केली असून, गुढीपाडव्याच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होणार आहे. अर्थसंकल्पात प्रभाग निधी आणि नगरसेवक स्वेच्छा निधीची देखील तरतूद करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली.

नाशिक मनपा आयुक्तांनी अर्थ संकल्प सादर केला आहे. २४००.७५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. त्यात १.८१ कोटी शिल्लाकचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. दरम्यान he बजेट थोडक्यात पुढीलप्रमाणे आहे.

-मालमत्ता आणि पाणीपट्टी करात कोणतीही वाढ नाही, २५ टक्के पेक्षा प्रॉपर्टी टॅक्स पुढील वर्षी वसूल होईल

-यशवंत मंडई येथे पार्किंग होईल
मल्टी लेव्हल पार्किंग प्रस्तावित करण्यात आले आहे.

-नमामि गोदा..प्रदूषण थांबवणे, आणि सौंदरर्यिकरण

-निधी मागणीसाठी केंद्र सरकारकडे अहवाल सादर होईल

-फाळके स्मारक साठी पर्यटन वधीसाठी प्रयत्न होईल

-सिंहस्थ कुंभमेळा साठी पूर्वतयारी सुरू

-आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम दुसऱ्या टप्प्यातील काम होईल

-बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान दुसऱ्या टप्प्यातील काम होईल १० कोटी खर्च तरतूद
गुढीपाडवा साठी नववर्ष स्वागत सांस्कृतिक कार्यक्रम होईल.

-प्रभाग निधी आणि नगरसेवक स्वेच्छा निधीची तरतूद