नगरपंचायत निवडणूक निकाल : दिंडोरी नगरपंचायतीत सेनेची बाजी, पहा इतर निकाल

नाशिक । प्रतिनिधी

सर्वांचे लक्ष लागू असलेल्या नगरपंचायत निवडणुकांचा निकाल हाती येण्यास सुरवात झाली आहे. दिंडोरी नगरपंचायतीत सेना वरचढ ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.

नगरपंचायतीचे नाव – दिंडोरी एकुण जागा – 17
भाजप – 4, शिवसेना – 6 (शिवसेनेची 1 जागा अगोदर बिनविरोध झाली होती), काँग्रेस – 2, राष्ट्रवादी – 5, इतर (अपक्ष) – 00 असे चित्र आहे. शिवसेनेच्या सर्वाधिक 6 जागा निवडून आल्या आहेत.

जिल्ह्यातील देवळा, दिंडोरी, कळवण, निफाड, सुरगाणा आणि पेठ या सहा नगरपंचायत निवडणुकांचा निकाल लागण्यास सुरवात सुरवात झाली आहे. थोड्याच वेळात या नगरपंचायत निवडणुकांचे निकाल हाती येणार आहेत. दोन टप्प्यात झालेल्या या निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यातील काही नगरपंचायतीत महाविकास आघाडीमध्ये फूट पडली होती. त्यामुळे काही ठिकाणी सत्तांतर होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

विशेष म्हणजे या नगरपंचायत निवडणूक ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडल्या आहेत. त्यामुळे कोण कुठे बाजी मारेल हे सांगता येणार नाही. मात्र या निवडणूक निकालामुळे जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांचे प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि केंद्रीय मंत्री भारती पवार या नेत्यांचे लक्ष लागून आहे. ओबीसी आरक्षण शिवाय झालेल्या या पहिल्या निवडणुकांचा निकाल काय येणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

तर काही ठिकाणी मतमोजणीला सुरवात झाली असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये पोलिस निरीक्षक दर्जाचे अधिकारी तर पोलिस कर्मचारी यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.