नाशिक भाजप महिला आघाडीचे रस्त्यावर वाईन ओतत आंदोलन

नाशिक । प्रतिनिधी

राज्य सरकारने किराणा दुकानात मद्यविक्री होणार असल्याची घोषणा केली. मात्र, या विरोधात भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे, नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप महिला आघाडीने चक्क रस्त्यावर वाईनची बॉटल ओतत अनोखे आंदोलन केले आहे.

वाईन विक्रीच्या नव्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली आहे. जे सुपर मार्केट १ हजार स्वेअर फुटांच्यावर आहेत तिथं एक स्टॉल टाकून वाईन विक्रीला सरकारनं मुभा दिली आहे. या निर्णयावर विरोधी पक्षांकडून महाविकास आघाडी सरकारवर टीका होऊ लागली आहे. या आंदोलनावेळी भाजप महिला आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या. यावेळी ठाकरे सरकार (Thakarey government) हाय हाय, या उध्वस्थ सरकारचा धिक्कार असो अशी घोषणाबाजी करण्यात आली.

आज सकाळी आमदार सीमा हिरे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपतर्फे महाविकास आघाडीसरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच, वाईन ची बॉटल रस्त्यावर ओतून निषेध करण्यात आला. यावेळी उत्साही महिला कार्यकर्तीने रस्त्यावर ओतलेल्या वाईनवर नाचत निषेध व्यक्त केला. तसेच ठाकरे सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

दरम्यान, उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे (hagwat doiphode) यांना या महिलांनी निवेदन दिले. या निवेदनावर आमदार देवयानी फरांदे (MLA Deoyani Farande), शहराध्यक्ष गिरीश पालवे (Girish Palave), आमदार सीमा हिरे यांच्यासह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.