नाशिककरांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ घरांची पट्टी माफ होणार

नाशिक | प्रतिनिधी

मुंबई महापालिकेच्या धर्तीवर नाशिक महापालिका हद्दीतील पाचशे चौरस फुटांच्या सदनिकांची घरपट्टी माफ करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या कडे पत्राद्वारे केली.

महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याकडील बैठकीत सदरच्या विषयावर सकारात्मक चर्चा करणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री यांनी दिले.

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पाचशे चौरस फुटांच्या सदनिकांची घरपट्टी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माफ केली आहे. याच निर्णयाची अंमलबजावणी नाशिक महानगरपालिका हद्दीतील सदनिकांवर घेण्यात यावी. नाशिक महापालिका क्षेत्रात सुमारे ४ लाख ५५ मिळकती असून त्यातील पाचशे फुटांपर्यंतच्या सदनिकांमध्ये मध्यमवर्गीय नागरिक वास्तव्यास आहे.

कोरोनामुळे मध्यमवर्गीय कुटुंबाची आर्थिक व्यवस्था बिकट बनली असून त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अशा गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांना दिलासा देण्याकरिता ५०० चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांची घरपट्टी माफ होणे आवश्यक असल्याचे पत्रात नमूद केले आहे.

महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याकडील बैठकीत सदरच्या विषयावर सकारात्मक चर्चा करणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री यांनी दिले.