Home » नाशिक जिल्ह्यातील सहाही नगरपंचायतीचे निकाल पहा एका क्लिकवर

नाशिक जिल्ह्यातील सहाही नगरपंचायतीचे निकाल पहा एका क्लिकवर

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यातील देवळा, दिंडोरी, कळवण, निफाड, सुरगाणा आणि पेठ या सहा नगरपंचायत निवडणुकांचा निकाल लागला असून सर्वच ठिकाणी धक्कादायक निकाल हाती आला आहे.

दरम्यान काही तासांपूर्वी जिल्ह्यातील देवळा, दिंडोरी, कळवण, निफाड, सुरगाणा आणि पेठ या सहा नगरपंचायत निवडणुकांचे निकाल हाती आले. यामध्ये भाजपने मुसंडी मारली असून एकूण जागा १०२ जागांपैकी ३० जागांवर विजय मिळवला आहे. मात्र निफाड, पेठ या नगरपंचायत निवडणुकांत भाजपा मागे पडली आहे.

तर या सहा नगरपंचायत निवडणुकांत २५ जागांसह शिवसेना दुसऱ्या स्थानावर असून राष्ट्रवादी २८, काँग्रेस ०६, माकप ०५, मनसे ०१, इतर ०७ अनुक्रमे आहेत.

असा आहे निकाल

सुरगाणा नगरपंचायत
भाजपचं वर्चस्व, सेनेला धक्का

एकूण जागा – 17

शिवसेना – 06
भाजप – 08
माकप – 02
राष्ट्रवादी काँग्रेस – 01

देवळा नगरपंचायत
भाजपचा एकहाती विजय

एकूण जागा – 17

भाजप – 15
राष्ट्रवादीला – 2

निफाड नगरपंचायत
भाजपची सत्ता उलथवली, शिवसेनेचा भगवा फडकला

एकूण जागा – 17

शिवसेना- 07
राष्ट्रवादी काँग्रेस- 03
काँग्रेस – 01
शहर विकास आघाडी – 04
बसपा- 01
इतर(अपक्ष)-01

कळवण नगरपंचायत
राष्ट्रवादीचं वर्चस्व, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना धक्का

एकूण जागा – 17

राष्ट्रवादी – 09
भाजप – 02
काँग्रेस – 03
शिवसेना – 02
मनसे – 01

दिंडोरी नगरपंचायत
शिवसेनेला सर्वाधिक जागा, महाविकास आघाडीकडे सत्ता

एकूण जागा – 17

राष्ट्रवादी – 05
शिवसेना – 06
काँग्रेस – 02
भाजपा – 04

पेठ नगरपंचायत
सेनेचं वर्चस्व संपुष्टात, राष्ट्रवादीकडे सत्ता

एकूण जागा – 17
राष्ट्रवादी – 08
शिवसेना – 04
माकप – 03
भाजप – 01
अपक्ष – 01

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!