Home » नाशिक जिल्ह्याची म्युकरमायकोसिसवर यशस्वीरीत्या मात

नाशिक जिल्ह्याची म्युकरमायकोसिसवर यशस्वीरीत्या मात

by नाशिक तक
0 comment

नाशिक | प्रतिनिधी

ओमायक्रोन चे रुग्ण (Omicron Patients) वाढत असल्याने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची (Corona Third wave) भीती सर्वत्र व्यक्त होत असतांना नाशिक जिल्ह्यासाठी (Nashik District) दिलासादायक बातमी समोर आली आहे.

नाशिक जिल्ह्याने म्युकरमायकोसिसवर (Mucormycosis) यशस्वी रित्या मात केली असून डिसेंबर अखेर म्युकरमायकोसिस शून्यावर आल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे (Collector Suraj Mandhare) यांनी सांगितले. दरम्यान नाशिककरांनी नियमांचे पालन केल्यास तर संभाव्य संकटावरही मात करता येऊ शकेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कोरोनाचा दुसरी लाट ओसरत असतांना ब्लॅक फंगस (Black Fungus) अर्थात बुरशीजन्य म्युकरमायकोसिसचे (Mucormycosis) रुग्ण आढळल्याने यंत्रणेला चांगलाच धक्का बसला होता. अचानक रुग्ण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेकडून काटेकोर खबरदारी घेण्याबरोबरच रुग्णांना दिलासा देण्याचे आव्हान देखील होते. जिल्ह्यात ७८५ रुग्णांना म्युकर मायकोसिसचे निदान झाले. यापैकी ७०१ रुग्ण बरे झाले असून ८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत म्युकर मायकोसिसने डोके वर काढले होते. ज्यांना कोरोना होऊन गेला आहे, अशा रुग्णांमध्ये म्युकर मायकोसिस आढळत असल्याने सर्वत्र भीती आणि चिंता व्यक्त केली जात होती. अगोदरच कोरोनाची दुसरी लाट महाभयानक असतांना नव्याने काळ्या बुरशीने यंत्रणा हादरून गेली. परंतु आता जिल्हा या संकटातून सावरला असून नाशिककर संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी सज्ज आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!