नाशिककरांनो, प्लास्टिक वापरू नका, अन्यथा आता थेट जेलची हवा

नाशिक । प्रतिनिधी
नाशिक महापालिका प्लास्टिक बंदी साठी एक्शन मोड मध्ये आली असून नव्याने प्लास्टिकबंदीसाठी मोहीम सुरु करण्यात आली आहे. पर्यावरणाची आणि नागरिकांच्या आरोग्याची हानी टाळण्यासाठी प्लास्टिकच्या वापरावर बंदी पुन्हा बंदी आणण्यात येत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून प्लास्टिक बंदीसाठी देशभरात जनजागृती केली जात आहे. अनेकदा याबाबत उपाययोजना करून प्लस्टिक वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई देखील करण्यात येत होती. याच धर्तीवर प्लास्टिकच्या सर्व उत्पादनांवर आणि त्यांच्या वापरावर पूर्णपणे बंदी आणून महाराष्ट्र प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र या मोहिमेला विसर पडल्याने ‘पहिले पाढे पच्चावन्न’ अशी गट झाली होती. आता नव्यने नाशिक महानगरपालिकेने या मोहिमेला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करीत आहे.

नाशिक महापालिका प्लास्टिक बंदी साठी नवी मोहीम सुरु केली असून आता प्लास्टिक वापरल्यास थेट २५ हजार रुपयांचा दंड होणार आहे. सोबत तीन महिने कारावास देखील होऊ शकतो. ७५ मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या वापरल्यास थेट कारवाई होणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून बंद असलेल्या प्लास्टिक बंदीला पुन्हा जोर देण्याचा प्रयत्न नाशिक महापालिका करीत आहे.

पर्यावरणासाठी घातक ठरणाऱ्या प्लास्टिकचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनासंसर्गात प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने मोठ्या प्रमाणात प्लास्टिक वस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, आता पुन्हा नाशिक महापालिकेने प्लास्टिक बंदीचा विडा उचलला असून हि मोहीम कितपत यशस्वी होते, हे पाहणे आवश्यक ठरणार आहे.