नाशिक मनपा महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृतदेह आढळला

नाशिक | प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिकेच्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. नाशिक घोटी हायवेजवळील वाडीव-हे परिसरात एका वाहनात मृतदेह आढळला असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

डॉ सुवर्णा वाझे-जाधव असे या महिला अधिकाऱ्याचे नाव असून या घटनेने नाशिक आरोग्य प्रशासनात खळबळ उडाली आहे. वाझे या महापालिकेच्या आरोग्य विभागातील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत होत्या. महत्वाचे म्हणजे कालच सुवर्णा वाजे-जाधव यांच्या पतीने मिसिंगची तक्रार दिली होती. मात्र त्यानंतर वाहनात जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने विविध चर्चाना उधाण आले आहे.

नाशिकच्या वाडीवऱ्हे परिसरात हे वाहन जळालेल्या अवस्थेत आढळून आले तर सुवर्णाचे वझे यांचा मृतदेह देखील वाहनात जळालेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेनंतर मनपा व पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.