Home » नाशिकमधील बापू पुलाजवळ पोलिसाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

नाशिकमधील बापू पुलाजवळ पोलिसाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

by नाशिक तक
0 comment

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक पोलीस दलातील अंमलदाराचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. शहरातील बापू पुलाजवळील काकड मळा येथील विहिरीत मृतदेह आढळून आला आहे.

दरम्यान मृतदेहाची ओळख पटलेली असून पोलीस दलातील अमलदार विलास सोनार यांचा मृतदेह असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

विलास सोनार हे विशेष शाखेत कार्यरत होते. सरकारवाडा पोलिस ठाण्याचे हद्दीत त्यांची ड्युटी होती. मागील दहा बारा दिवसांपासून कामावर हजर नव्हते. ते अशोक स्तंभ ढोल्या गणपती चे मागे वास्तव्यास असल्याची प्राथमिक माहिती आहे.

या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे. या गूढ मृत्यूने पोलीस दलाच्या भुवया उंचावल्या आहेत. ही हत्या? की आत्महत्या? याबाबत म्हसरूळ पोलीस तपास करत आहेत.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!