पत्रास कारण की! नाशिक टपाल कार्यालय झाले १२० वर्षाचे

नाशिक। प्रतिनिधी
स्वातंत्र्यपूर्व काळात १९०२मध्ये नाशिकमध्ये टपाल कार्यालय स्थापन होऊन १२० वर्षे झाली आहेत. त्या पार्श्वभूमीवर नाशिकचे मुख्य टपाल कार्यालय असलेल्या इमारतीच्या १२० वा वाढदिवस कर्मचाऱ्यांनी केक कापून साजरा केला.

१६ फेब्रुवारी १९०२ मध्ये नाशिकमध्ये इंग्रजांनी टपाल कार्यालय सुरु केले होते. त्यावेळी नाशिक उपडाकघर म्हणून हे कार्यालय सुरु झाले असावे, असे सांगितले जाते. आता या जागेवर मुख्य टपाल कार्यालय सुरु असून नाशिक जिल्ह्यात टपालसेवा पुरवली जात आहे. इंग्रजांनी स्थापन केलेल्या या जागेवरच सध्याची मुख्य टपाल कार्यालयाची इमारत असून, त्यामध्ये आता नव्याने बांधकाम करण्यात आले आहे.

याच ठिकाणी नाशिकचे टपाल कार्यालय सेवा बजावत आहे. इंग्रज राजवटीच्या काळातील कौलारू बनावटीच्या इमारतीमध्ये सुरु झालेल्या या टपाल कार्यालयाच्या इमारतीत वेळोवेळी बदल होत गेले.

दरम्यान नूतन इमारत बांधल्यानंतर १६ फेब्रुवारी २००२ मध्ये उदघाटनासाठी तत्कालीन माहिती व प्रसारण मंत्री ए राजा यांच्या हस्ते झाले होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री देखील उपस्थित होते. गेल्या १२० वर्षांच्या कालावधीत भारतीय टपाल कार्यालयाने अनेक स्थित्यंतरे पाहिली दरम्यान या दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रम प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते.