नाशकात पावसाने मोडला ५४ वर्षातला ‘हा’ विक्रम

नाशिक | प्रतिनिधी

नाशिकसह जिल्ह्यात बुधवार सकाळपासून ढगाळ वातावरणासह जोरदार पाऊस बरसला.

अनेक सखल भागात पाणी साचले असून नाशिक जिल्ह्यात दाणादाण उडाली आहे. या २४ तासांतील पावसामुळे मागील ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे.

बुधवार सकाळपासून गुरुवार सकाळपर्यंत नाशिक शहरांत तब्बल ६३.८ मिमि पावसाची नोंद झाली आहे. १६ डिसेंबर १९६७ ला ३१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती. मात्र नाशिक शहरांत मागील २४ तासांत झालेल्या पावसाने नवा विक्रम रचला आहे.

दरम्यान काल सकाळपासून सुरू झालेला पाऊस रात्रभरही जोरधार होता. त्यानंतर गुरुवारच्या सकाळी काहीअंशी पाऊस थांबला असून मात्र वातावरण ढगाळ आहे. त्यामुळे आजही पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.