राज्यातील ‘या’ जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट

नाशिक | प्रतिनिधी
राज्यात पुढील २४ तासांत उत्तर कोकणासह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार आहे. तर धुळे, नंदुरबार, नाशिक, पालघर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

अरबीच्या समुद्रात पश्‍चिम किनारपट्टीला समांतर असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाची रिमझिम सुरू झाली आहे. प्रादेशिक हवामान विभागाच्या शुभांगी भुते यांनी सांगितले की अरबी समुद्रातील वादळी परिस्थिती मुळे पुढील काही दिवस ढगाळ हवामानासह पाऊस बरसणार आहे. यामध्ये कोकणातील व मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.

तर पुढील २४ हे वादळी असून मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.