Home » नाशिकमधील ‘या’ प्रभागांत उद्या पाणी नसणार, कोणत्या भागात पुरवठा बंद, घ्या जाणून!

नाशिकमधील ‘या’ प्रभागांत उद्या पाणी नसणार, कोणत्या भागात पुरवठा बंद, घ्या जाणून!

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी
नाशिकमध्ये (Nsahik) उद्या शुक्रवारी पुन्हा एकदा पाण्याने दांडी मारली आहे. त्यामुळे नागरिकांना निर्जळीचा सामना करावा लागणार आहे. गांधीनगर जलशुध्दीकरण केंद्र व नाशिकरोड जलशुध्दीकरण केंद्र येथील गुरुत्व जलवाहिनीची मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली आहे.

त्यामुळे येथे व्हॉल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या (Municipal Corporation) पाणीपुरवठा विभागाने कळवल्यानुसार नाशिकरोड परिसरातील अनेक भागात उद्या शुक्रवारी पाणीपुरवठा (water supply) बंद राहणार आहे.

गांधीनगर जलशुध्दीकरण केंद्र व नाशिकरोड जलशुध्दीकरण केंद्र येथील गुरुत्व वाहिनीवरील 900 मि.मि. व्हॉल दुरुस्ती कामासाठी शुक्रवार रोजी (दि. ११) शटडाऊन आवश्यक आहे. त्यामुळे मनपाचे गांधीनगर जलशुध्दीकरण केंद्र येथुन पाणी पुरवठा होणा-या नाशिक पुर्व विभागातील प्र.क्र. २३ भागश: व ३० भागश: साईनाथ नगर, विनय नगर, अमृत वर्षा कॉलनी, वडाळा रोड, जयदीप नगर, मिल्लत नगर, जे एम सी टी कॉलेज परिसर, रॉयल कॉलनी, रजा कॉलनी, रहनुमा नगर, गणेश बाबा नगर, आदित्य नगर, कल्पतरू नगर, पखाल रोड, मातोश्री कॉलनी, ममतानगर, अशोका मार्ग, इ. परीसर.

तसेच संपुर्ण नाशिकरोड विभागातील प्रभाग क्र. १७,१८, १९, २०, २१ व २२ मधील पाणीपुरवठा शुक्रवार (दि.११)रोजीचा सकाळी ०९ वाजेनंतर व सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. तसेच शनीवार (दि.१२) रोजीचा सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल याची नागरीकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मनपाकडून करण्यात आले आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!