Home » नाशिकमधून ‘या’ लाल सोन्याची तस्करी सुरूच

नाशिकमधून ‘या’ लाल सोन्याची तस्करी सुरूच

by नाशिक तक
0 comment

सुरगाणा । प्रतिनिधी
उंबरठाण वनपरिक्षेत्रात सागवानसह खैर लाकडाची तस्करी सुरुच.रात्रीच्या गस्तीत हजारोंचा मुद्देमाल जप्त. तस्कर अंधाराचा फायदा घेऊन
फरार झाले आहेत.

याबाबत उंबरठाण वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी शेख यांनी सांगितले की, गुप्त माहिती मिळाल्यानंतर नियत क्षेत्र उबरठाण मधील दरापाडा(उ) राखीव वनविभागाच्या हद्दीत रात्रीची गस्त घालतांना एक टोयोटा क्वालिस वाहन (क्र.जी.जे १९,एम.५८३५) हे वाहन तपासणी करीता थांबवले असता सदर वाहनातील अज्ञात इसम रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला.

सदर वाहनांची तपासणी केली असता वाहनांमध्ये खैर जातीच्या लाकडाचे नग दिसून आले. वाहन कोणाचे आहे हे तपासण्यासाठी ताब्यात घेण्यात आले आहे. घटनास्थळी कसून चौकशी केली असता जी. जे. १५,एन ००१८ हि दुचाकी बेवारस स्थितीत आढळून आली. खैर प्रजातीचे ७ नग मिळाले असून १.१०८ घनमिटर आहे. त्याची किंमत २११३७ रुपये आहे. टोयोटा क्वालिस वाहनांची किंमत एक लाख वीस हजार रुपये आहे. हिरो होंडा दुचाकींची किंमत ७०,००० हजार रुपये आहे.

या गुन्हे कामी उपवनसंरक्षक पुर्व भाग नाशिकचे तुषार चव्हाण, सुरगाणा येथील सहाय्यक वनसंरक्षक रोजगार हमी योजना व वन्यजीव संरक्षक हेमंत शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उंबरठाण येथील वनपरिक्षेत्र अधिकारी बी.आर.शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली. वनविभागाकडून तस्करांचा कसून शोध घेतला जात आहे. गुजरात सिमेवरील पिंपळसोंड, सोनगीर या भागातून खैर व सागवान लाकडाची तस्करी अद्यापही सुरूच असल्याचे बोलले जात आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!