नाशिककरांनो सावधान ! गोवरचे संकट अधिक गडद

By : Revti Walzade

नाशिक- मुंबई नंतर आता नाशिक मध्ये देखील गोवरचा शिरकाव झाला आहे. नशिक मध्ये गोवरचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला मुंबई मध्ये लहान बालकांवर गोवर रुबेलाच संकट ओढवल होत. मिळालेल्या माहिती प्रमाणे नाशकातही पाच बालकांना गोवर ची लक्षणे आढळल्याने भीती चे वातावरण निर्माण झाले आहे.

गोवर रुबेला हा रोग लहान बालकांना मोठ्या प्रमाणात होत असल्याच तज्ञांनी संगीतल. मुंबई मध्ये गेल्या दोन आठवड्यानपासून रुबेला मोठ्या प्रमाणावर वाढतोय. त्या पाठोपाठच आता नाशिक मध्ये देखील लहान मुलांमध्ये रुबेलाचे प्रमाण वाढताना दिसतेय. नाशकात गेल्या काही दिवसात ४ संशयित रुग्णांचे अहवाल आलेले नसताना अजून ५ बालकांना गोवर ची लागण झाल्याच समजतय. त्यामुळे नाशिक मधील गोवरसंशयीतांचा आकडा 9 वर गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गोवर हा रोग संसर्गजन्य असल्यामुळे अधिक वेगाने पसरू शकतो. या बद्दलची खबरदारी म्हणून महापालिकेने बिटको आणि डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात गोवरसारख्या संसर्गजन्य संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष सुरू केले आहे.

गोवर ची लागण झालेल्या रुग्णांमध्ये सर्दी, खोकला, ताप आणि मग अंगावर लालसर पुरळ येणे अशी लक्षणे पाहायला मिळतात. मुख्य म्हणजे निरोगी आणि धडधाकट मुलांना याचा जास्त त्रास होत नाही. गोवर मुलाच्या वयाच्या पहिल्या २-3 वर्षातच येऊन जातो. गोवर हा विषाणूने पसरणारा आजार आहे. हा विषाणू मानवी शरीरा बाहेर फार काळ तग धरू शकत नाही. थंड वातावरणात तो बराच काळ राहू शकतो. म्हणून थंडीमध्ये गोवर रुबेलाची मोठ्या प्रमाणावर लागन् होते. कुपोषण हे गोवर मागचे मुख्य कारण समजले जाते. पूर्वीच्या काळात गोवर हा रोग साथीच्या रोगाप्रमाणे दर २,3 वर्येषांनी येत असे. पण सुदैवाने गोवरवरची प्रतिबंधात्मक लस उपलब्ध असल्याने गोवारचे प्रमाण आधी पेक्षा फार कमी झाले आहे.

रुबेला वर प्रतीबंदात्मक उपाय म्हनून आपण बालकांच्या आहारा कडे लक्ष देणे महत्वाचे आहे. रुबेलावर अजूनतरी विशिष्ट असे कुठले औषध नाही त्यामुळे वाढती रुग्णसंख्या बघता नाशिक महापालीकेने लसीकरणाची गती वाढवण्याचे आदेशही दिले आहे. नाशिक सोबत मालेगावातही रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे मालेगावात गोवरचे तब्बल ५६ रुग्ण आढळून आलेले असून यातील ११ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. अश्या परीस्थित गोवरप्रतिबंधात्मक लसीकरण वाढवणे महत्वाचे आहे.