नाशिकचे मराठी साहित्य संमलेन, इथे पहा लाइव्ह

नाशिक । प्रतिनिधी

साहित्य संमेलन म्हणजे एकाच वेळी विविध प्रकारचे साहित्य, साहित्य विषयक चर्चा- परिसंवाद, सां स्कृतीक कार्यक्रम लोकांपर्यंत घेवून जाण्याचा उत्सव. पण कधीकधी प्रत्यक्ष संमेलन स्थळी जाणे शक्य नसते. ९४ व्या साहित्य संमेलनात होणा-या कार्यक्रमांपासुन साहित्य रसिक वंचित राहू नये यासाठी संमेलनाची सोशल मिडिया- डिजिटल मार्केटींग समिती संपूर्ण संमेलन रसिकांपर्यंत घेवून जाणार आहे.

या संमेलनातील सर्व कार्यक्रम जसे ग्रंथदिंडी, उद्घाटन सोहळा, कविकट्टा, कविसंमेलन, विविध विषयांवरील परिसंवाद , बालसाहित्य मेळावा, आणि संस्कृतीक कार्यक्रम संमेलनाच्या अधिकृत सोशल मिडिया पेज , युट्यूब चॅनल आणि वेबसाईट वर लाईव्ह बघायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे संमेलनात आलेल्या रसिकांशी आणि निमंत्रितांशी आम्ही लाईव्ह गप्पा मारणार आहोत. यामुळे रसिकांना घरी बसून सुद्धा संमेलनाचा आस्वाद घेतां येईल.

संमेलनाची कार्यक्रम पत्रिका, संमेलन स्थळी येण्या- जाण्याची सोय व इतर तपशीलासाठी रसिकांनी संमेलनाची अधिकृत सोशल मिडिया पेजेस फ़ॉलो करावीत असे आवाहन सोशल मिडिया- डिजिटल मार्केटींग समितीचे प्रमुख हेमंत बेळे, पालक पदाधिकारी फणींद्र मंडलिक आणि समिती सदस्य मिथिलेश मांडवगणे, आदित्य नाखरे, नितीन बिल्दीकर, सुमित गोखले, राहूल रायकर, अभिजीत अष्टेकर, सचिन काठे, अमोल जोशी व रूचिता ठाकूर यांनी केले आहे.

https://www.facebook.com/94abmssnsk/ | https://www.youtube.com/channel/ 94abmssnsk | https://twitter.com/94abmssnsk |