Home » नाशिक जिल्ह्यात नव्या रुग्णांची संख्या पंधराशेच्या घरात

नाशिक जिल्ह्यात नव्या रुग्णांची संख्या पंधराशेच्या घरात

by नाशिक तक
0 comment

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यात (Nashik District) कोरोना रुग्णांची (Corona Patient’s) संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच आज जिल्ह्यात दिवसभरात १४५० जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह ( Corona reports Positive) आल्याने खळबळ उडाली आहे. नाशिक जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येने हजारचा आकडा पार केला आहे.

जिल्हा प्रशासनास प्राप्त (Nashik Administration) अहवालानुसार मागील चोवीस तासात १४५० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक (Nashik) शहरात १०३८, नाशिक ग्रामीण विभागात ३५०, मालेगाव १४, तर जिल्हाबाह्य ४८ अशी नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

दिलासादायक म्हणजे आज दिवसभरात जिल्ह्यात एकही कोरोना रुग्णांचा मृत्यू नाही. मात्र आतापर्यंत मृत्यूचा आकडा हा ८ हजार ७६५ वर आहे. तर आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण ४६९ च्या आसपास आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत कमालीची वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्याचे आदेश देण्यात आले असून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे आता नाशिक जिल्ह्यातही हे निर्बंध लागू होणार यात शंका नाही.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!