अन्यथा आपल्याला लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल? : राजेश टोपे

मुंबई । प्रतिनिधी
सध्या देशासह राज्यात कोरोनासह ओमायक्रोन चे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ झालीच तर आणखी कडक निर्बंध लावण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे वेळीच धोका ओळखून लोकांनी गर्दी टाळावी, निर्बंध पाळावेत आणि सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन राजेश टोपे यांनी यावेळी केले आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषदेत हि माहिती दिली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले कि, ओमायक्रॉनचा वेग हा काळजी करायला लावणारा आहे. या वेगावर वेळीच नियंत्रण ठेवले नाही, तर रुग्णवाढीने पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेवर ताण येण्याची भीतीही नाकारता येणार नाही, या पार्श्वभूमीवर राज्यात कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

तसेच ते पुढे म्हणाले कि, तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झाले असून सर्वानी काळजी घेणे आवश्यक आहे. आगामी काळात जर तिसरी लाट आलीच तर आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. मात्र ज्या दिवशी ८०० मॅट्रीक टन ऑक्सिजन लागेल त्या दिवशी लॉकडाऊन करण्यात येईल.

अन्यथा संक्रमणाची गती अधिक असेल तर ऑक्सिजनची ८०० मॅट्रीक टनाची आवश्यकता ५०० मॅट्रीक टनावर आणावी लागेल. तशी परिस्थिती दिसत आहे, असे टोपे यांनी सांगितले. यापूर्वीच आपण राजभर निर्बंध लावले आहेत. लग्न समारंभ, हॉटेल्स, सिनेमा हॉल्स याबाबत निर्बंध जारी करण्यात आले आहेत. या सर्व निर्बंधांचं काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.