थर्टी फस्टचे सेलिब्रेशन यंदाही घरातच? ओमायक्रोनने वाढवली धास्ती

नाशिक । प्रतिनिधी
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या थर्टी फस्ट वर ओमायक्रोनचे सावट असल्याने यंदाची न्यू इयर पार्टी घरातच साजरी करावी लागणार कि काय असा प्रश्न नागरिकांना उपस्थित होत आहे.

दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असतांना कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने डोकेदुखी वाढवली आहे. त्यामुळे जगभरात दहशतीचे वातावरण असून सरकारकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. येत्या काही दिवसांवर थर्टी फस्ट आली आहे. मात्र आता ओमायक्रोनने धास्ती वाढवली असून त्यामुळे न्यू इयर पार्टीवच्या सेलिब्रेशन वर पाणी फेरणार आहे. तसेच हॉटेलचालकांची देखील चिंता वाढली आहे.

२०२१ या सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. सर्वत्र थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनचे नियोजन सुरू आहे. त्यातच मागील वर्षी कोरोनाच्या संकटामुळे सेलिब्रेशनवर निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांना नाईलाजाने घरीच सेलिब्रेशन करावे लागले. यंदा कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने नववर्षाचे स्वागत जल्लोषात होईल, अशी अपेक्षा असताना कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटने डोके वर काढले आहे. जगभरात ओमायक्रॉनची दहशत पसरल्याने नववर्ष स्वागतावर यंदाही निर्बंध येतील की काय? अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान मागील वर्षी प्रशासनाने नियमावली आखून दिली होती. यात थर्टी फर्स्टसाठी रात्री दहापर्यंत वेळ देण्यात आली होती. तसेच जमावबंदीचे आदेश होते. मात्र, यंदाची नियमावली अद्याप जाहीर झालेली नसून त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या दोन-तीन दिवसात नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र यंदाही असच झालं तर नागरिकांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाही थर्टी फस्ट चे सेलिब्रेशन घरातच करावे लागणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.