Home » देवळाली आर्टिलरी परिसरात आर्मीचा गणवेश घालून फिरणाऱ्या एकास अटक

देवळाली आर्टिलरी परिसरात आर्मीचा गणवेश घालून फिरणाऱ्या एकास अटक

by नाशिक तक
0 comment

नाशिक | प्रतिनिधी

नाशिकच्या (Nashik) देवळालीच्या आर्टिलरी (Deolali Artillery area) परिसरात आर्मीचा गणवेश (Army Uniform) घालून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणा-या एकाला अटक (Arrested) करण्यात आली आहे. गणेश पवार (Ganesh Pawar) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

नाशिकचा देवळाली आर्टिलरी परिसर संवेदनशील म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी स्थानिक आर्टिलरी प्रशासन चोख बंदोबस्त ठेवत असते. दरम्यान देवळालीच्या लष्करी भागात आर्मी ड्रेस घालून फिरत दिसला. लष्करी अधिकारी असल्याची बतावणी करत होता.

दरम्यान काही वेळांनंतर याठिकाणी तैनात असणाऱ्या आर्मीच्या जवानांच्या लक्षात ही बाब येताच या तोतया अधिकाऱ्याला जाब विचारण्यात आला. त्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

या प्रकरणी गणेश पवारच्या विरोधात देवळाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश हा चांदवड (Chandwad) तालुक्यातील हरसूल (Harsul) येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. शिवाय तो काही दिवस नांदुर नाका (Nandukarnaka) येथे वास्तव्याला असल्याचे देखील त्याने सांगितले आहे. ही माहिती मिळताच दोन्ही ठिकाणी पोलीस पथक रवाना झाले आहे. या घटनेचा कसून तपास केला जात आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!