नाशिक । प्रतिनिधी
लखमापूर (Lakhamapur) ता. दिंडोरी (Dindori Taluka) येथे विना परवानगी बैलगाडी शर्यतीचे (Bullock Cart Race) आयोजन केल्याबद्दल आयोजकासह इतर आठ जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Case Filed Against Organizers) करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारीच्या दिवशी लखमापूर शिवारातील मोकळ्या जागेत रवींद्र पवार (Ravindra Pawar) यांनी बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले होते. यावेळी हजारो बैलगाडा प्रेमींसह सहभागी उपस्थित होते. मात्र यावेळी कोरोनाचे (Corona Crisis) नियम पायदळी तुडवत असल्याचे पाहायला मिळाले. तर विशेष म्हणजे बैलगाडा शर्यतीला परवानगी घेतली नसल्याने आयोजकांना गाशा गुंडाळण्याची वेळ आली. त्यामुळे ओझरच्या बैलगाडा शर्यतीची 9Ojhar Bullock Cart Race) या ठिकाणी पुनरावृत्ती झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
दरम्यान हा प्रकार स्थानिक प्रशासनाच्या लक्षात येताच त्यांनी शर्यतीची माहिती घेतली. त्यानुसार उपायुक्त जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी बी आर नरवडे (Deputy Commissioner District Animal Husbandry Officer BR Narwade) यांनी बैलगाडा शर्यत आयोजकांविरुद्ध तक्रारी दाखल केली. त्यामुळे पोलिसांनी घटनेची दखल घेत आयोजक रवींद्र पवार आणि इतर ८ जनांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
यामध्ये विनापरवानगी बैलगाडा शर्यत आयोजन करणे आणि न्यायालयाच्या अटी शर्तींच उल्लंघन करणे तसेच कोरोना नियम न पाळणे आदी गोष्टीचा विचार करत पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यतीला न्यायालयाची परवानगी मिळाल्या नंतर दुसरा गुन्हा नाशिक (Nashik) मध्येच दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी ओझर (Ojhar) येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र बैलगाडा शर्यत सुरु होणयापूर्वीच आयोजकांनी रद्द केली होती. नंतर आयोजकांवर गुन्हाही दाखल करण्यात आला होता.