Home » तुम्ही मला साखळदंडात बांधू शकता, माझ्या विचारांना नाही!

तुम्ही मला साखळदंडात बांधू शकता, माझ्या विचारांना नाही!

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी

नेहमी चर्चेत राहणारे काँग्रेस नेते खासदार राहूल गांधीं (Rahul Gandhi) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत ते आपल्या ट्विटमुळे. राहुल गांधींनी आज महात्मा गांधींचा (Mahatma Gandhi) एक विचार ट्विटवर पोस्ट केला असून या माध्यमातून मोदी सरकारवर (Modi Government) अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. तर मोदी सरकारला गाधींच्या विचाराची आठवण दिल्याचे सांगण्यात येत आहे.

राहुल गांधी हे नेहमीच केंद्र सरकार (Central Government) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांविरोधात आक्रमक भूमिका घेत असतात. त्यामुळे अनेकदा संधी मिळाल्यावर केंद्राच्या धोरणांवर निशाणा साधण्यास ते चुकत नाहीत. कोरोना लसीकरण मोहीम (Corona Vaccination) असो की या साथीवर नियंत्रण ठेवण्यात सरकारचे कथित अपयश, अत्यावश्यक औषधांचा काळाबाजार असो, इंधनाच्या दरात (Petrol Price Hike) सातत्याने वाढ होत असल्याचा मुद्दा असो किंवा चीनसोबतचा सीमावाद असो, प्रत्येक मुद्द्यावर राहुल यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. यावेळी मात्र नाव न घेता चांगलाच मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

आज सकाळी राहुल गांधी यांनी एक ट्विट केले आहे. त्या ट्विट मध्ये म्हटले आहे कि, ‘“आप मुझे बेड़ियों से जकड़ सकते हैं, यातना दे सकते हैं, आप इस शरीर को ख़त्म भी कर सकते हैं, लेकिन आप मेरे विचारों को क़ैद नहीं कर सकते।”’ हा विचार महात्मा गांधींचा असून याचा अर्थ असा कि, तुम्ही मला साखळदंडात बांधून ठेऊ शकता, मला त्रास देऊ शकता, या शरीराला देखील संपवू शकता, मात्र माझे विचार तुम्ही मारू शकत नाही….

दरम्यान या पोस्ट्मध्ये कोणाचेही नाव घेतले नसले तरी ते कोणाला उद्देशून सांगत आहेत, हे नटेकऱ्यांच्या लक्षात आले आहे. ता ट्विटद्वारे राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) टोमणे मारले आहेत.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!