तेलंगणा आणि छत्तीसगड सीमेवर मोठी कारवाई

नाशिक | प्रतिनिधी
तेलंगणा-छत्तीसगड राज्यांच्या सीमेवर पोलीस दलासोबत झालेल्या चकमकीत सहा नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची घटना घडली आहे.

तेलंगणातील मुलुगू आणि छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्याच्या सीमेवर सोमवारी सकाळी झडलेल्या या चकमकीत सहा नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आल्याचे निदर्शनास आले आहे. सीआरपीएफ तेलंगणा पोलीस आणि छत्तीसगड पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे.

दरम्यान या कारवाईनंतर घटनास्थळी मोठा शस्त्रसाठा जप्त झाला असून सीमेवरील जंगलात सर्च ऑपरेशन सुरू आहे.

तेलंगणा आणि छत्तीसगड सीमेवर नेहमी कारवाया होत असून आज झालेल्या कारवाईमुळे सीआरपीएफ तेलंगणा पोलीस आणि छत्तीसगड पोलीस सतर्क झाले आहेत.