Video : हॉटेलचं नूतनीकरण गेस्टच्या जीवावर बेतलं!

नाशिक | प्रतिनिधी
अंबड लिंक रोड (Ambad Link Road) परिसरात हॉटेलचे नूतनीकरण एका गेस्टच्या जीवावर बेतले आहे. रूम पाहायला गेलेल्या गेस्टचा (Hotel Guest) तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे.

विनोद गीते असे मृत युवकाचे नाव आहे. अंबड लिंक रोड वरील एक्सलेन्स इन (Hotel Exellence Inn) या हॉटेल मधील ही धक्कादायक घटना घडली आहे. तर हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV) देखील कैद झाला आहे. सदर घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

अंबड परिसरात हॉटेल एक्सलेन्स इनच्या आवारात नूतनीकरण काम सुरू आहे. त्यामुळे काही ठिकाणी खोदकाम करण्यात आले होते. तर काही भाग तोडण्यात आला होता. यावेळी एक गेस्ट रूम पाहायला आला होता. मात्र येथे चालू असलेले खोदकाम लक्षात न आल्याने हा युवक थेट तिसऱ्या मजल्याहून (Third Floor) दगडावर कोसळल्याने आणि यात त्याचा जागेवर मृत्यू झाला.

दरम्यान या घटनेत दोन सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून त्यांची तपासणी करण्यात येत आहे. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा युवक तोडण्यात आलेल्या बांधकामात पडत असल्याचे दिसते. तर दुसऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणात खाली पडत असल्याचे दिसत आहे. सदर घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.