नाशिक | प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून ईदगाह मैदानात उपोषणास बसलेल्या बाजार समितीतील कर्मचाऱ्यांचे आंदोलन अखेर पोलिसांनी उधळवून लावले आहे.
नाशिक कृषि उत्पन्न बाजार समितीच्या भ्रष्टाचारा विरोधात आणि आपल्या विविध मागण्यांसाठी तब्बल १५३ दिवसांपासून इदगाह मैदानावर सुरू हे आंदोलन सुरू होते. अखेर बाजार समिती कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन पोलिसांनी मोडून काढले आहे. तर उपोषणकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
बाजार समितीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत ईदगाह मैदानावर गेल्या पाच महिन्यांपासून कर्मचाऱ्यांनी उपोषण सुरू केले होते. सदर आंदोलन मोडून काढण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून पोलिसांकडून प्रयत्न सुरू होते. तर सदर आंदोलनाची दखल कोणीही घेतली नाही, किंवा याबाबत बाजार समितीने काही ठोस पाऊले उचलली. मात्र आता पोलीसांनीच हे आंदोलन उधळून लावले आहे.
यावेळी कर्मचाऱ्यांनी पोलिसांना जाब विचारला मात्र पोलिसांनी कर्मचार्यांकडे लक्ष न देता आंदोलन हटवण्याचे काम केले. त्यामुळे गेल्या पाच महिन्यापासून सुरू असलेले आंदोलन क्षणार्धात चिरडले गेले आहे.