पेठ नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचे घड्याळ

पेठ । प्रतिनिधी

पेठ नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचे घड्याळ चालले असून नगराध्यक्षपदी करण करवंदे यांची वर्णी लागली आहे. तर उपाध्यक्षपदी माकपाचे अफरोजा शेख यांची निवड करण्यात आली आहे.

पेठनगर पंचायतीत राष्ट्रवादी -८, शिवसेना -४, माकप -३, भाजप-१ ,अपक्ष -१ याप्रमाणे नगरसेवक आहेत. नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून करण करवंदे, आणि शिवसेनेकडून मनोज घोंगे यांनी अर्ज दाखल केले होते. आज नगराध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली. त्यात राष्ट्रवादीचे करण करवंदे यांची नगराध्यक्षपदी व माकपाच्या अफरोजा शेख यांची उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली.

याप्रसंगी नामदेव हलकंदर, इंद्रजीत गावित, राजू शेख, गणेश वळवी, मनोज घोंगे , राहुल चोथवे, युवराज लिमले, लता गायकवाड, छाया हलकंदर, विजय धूम, अबेदिन शेख, इमरान शेख, जावेद शेख , इनायत शेख, संकेत नेवकर, प्रवीण संगमनेरकर यांच्यासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.