Home » टाकी फुल्ल करून ठेवा! येत्या आठवड्यात पेट्रोल ‘भाव’ खाणार!

टाकी फुल्ल करून ठेवा! येत्या आठवड्यात पेट्रोल ‘भाव’ खाणार!

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी
येत्या आठवड्यात इंधनाच्या दरात वाढ होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले असून ११० डॉलरवर गेला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत.

महत्वाचे म्हणजे देशातील पाच राज्यात निवडणुका होत असून निवडणुकांनंतर तत्काळ देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किमान पंचवीस रुपयांची वाढ होऊन ते १३५ रुपये प्रतिलिटर ने मिळण्याची शक्यता आहे. येत्या आठवड्यात निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या भावात हळहळू दरवाढ होऊ शकते. मागील काही महिन्यात इंधन कंपन्यांना (Oil Marketing Companies) मोठा तोटा सहन करावा लागला. यामुळे हा तोटा भरून काढण्यासाठी आता पुढील आठवड्यात पेट्रोल महाग होण्याचा अंदाज आहे.

उत्तरप्रदेशात सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान येत्या सात मार्चला आहे. त्यानंतर पाचही राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल येत्या दहा मार्चला जाहीर होणार आहेत. एकिकडे आंतराराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढत असताना देखील भारतात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंधनाचे दर स्थिर ठेवण्यात आले होते. मात्र आता त्यामध्ये येणाऱ्या काळात मोठी वाढ पहायला मिळू शकते.

तर जगाचे लक्ष लागून असलेल्या रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे बाजार कोलमडले आहे. त्यामुळे या युद्धाचा परिणाम हा बाजारपेठेवर होताना दिसत आहे. महागाईचा भडका उडाला आहे. धातूसह सर्वच गोष्टी महागल्या असून कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले आहेत. युद्ध सुरूच राहिल्यास येत्या काळात सर्वच वस्तू महाग होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!