टाकी फुल्ल करा! पेट्रोल-डिझेल महागलं, पहा नाशिकमधील दर

नाशिक । प्रतिनिधी

आज देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक तेलाच्या किमती वाढल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत ही वाढ झाली आहे. पेट्रोल ८४ पैशांनी आणि डिझेलच्या दरात ८३ प्रतिलिटर पैशांनी वाढ करण्यात आली आहे. दरात यापुढेही दररोज वाढ होण्याची शक्यता वतर्वण्यात येत आहे.

दरम्यान पेट्रोल (Petrol), डिझेलच्या (Diesel) किंमतींमध्ये चार महिन्यांनंतर दरवाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर आज प्रतिलीटर ८० पैशांनी वाढवण्यात आले आहेत. भारताची राजधानी दिल्ली (Delhi) मध्ये पेट्रोल प्रतिलीटर ९६.२१ रूपये आहे तर डिझेल ८७.४७ रूपये आहे. तर आर्थिक राजधानी मुंबई (Mumbai) मध्ये इंधन दर (Fuel Rates) हे ₹११०.८२ प्रतिलीटर पेट्रोल आणि ९५ रूपये प्रतिलीटर डिझेल, नाशिकमध्ये १११. २४ प्रतिलीटर पेट्रोल आणि ९४ रूपये प्रतिलीटर डिझेल आहे.

जागतिक स्तरावर युक्रेन-रशिया संघर्षाच्या परिस्थितीमध्ये तेलाच्या किंमतींमध्ये वाढ होत आहे. त्याचा फटका देखील भारताला बसला आहे. वाढते इंधन दर, भारतीय रूपयामध्ये होत असलेली घसरण यामुळे पेट्रोल, डिझेलच्या किंमतींचा भडका उडाला आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे इंधनाच्या किंमती वाढल्या आहेत आणि अलीकडेच कच्च्या तेलाच्या किमतीत ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयातदार आणि ग्राहक आहे. आपल्या तेलाच्या गरजेपैकी ८५टक्के तेल आपण परदेशी बाजारपेठांमधून विकत घेतो. दरम्यान आपल्या स्थानिक डिझेल आणि पेट्रोलच्या किमती या दोन इंधनांच्या आंतरराष्ट्रीय किमतींशी निगडीत आहेत त्यामुळे क्रुड ऑईल मध्ये वाढ झाल्यास देशात इंधनदर वाढतात. कच्च्या तेलाच्या किमती ८१ डॉलरवरून १३० डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचल्या होत्या. कच्च्या तेलाच्या किमतीच्या किमतीत कमी झाल्या होत्या, पण सोमवारी​ दरात पुन्हा उसळी पाहायला मिळाली. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर रुपयाच्या घसरणीही परिणाम आहे.