नाशिक | प्रतिनिधी
शहरातील प्रभाग क्र.०५ मध्ये नगरसेविका प्रियांका माने यांच्या माध्यमातून त्यांचे कार्यालय मेरी राजबिहारी लिंक रोड येथे प्लस पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली.
पोलिओ आजाराच्या समूळ उच्चाटनासाठी राबविण्यात येणाऱ्या पल्स पोलिओ लसीरकण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला. दरम्यान या प्रसंगी शहरातील प्रभाग क्र.०५ मध्ये नगरसेविका प्रियंकाताई धनंजय माने यांच्या संपर्क कार्यालयाच्या पोलिओ लसीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी प्रभागातील शून्य ते पाच वर्षांच्या आतील बालकांना लसीकरणासाठी सांगण्यात आले. परिसरात अनेक बालकांचे पोलिओ लसीकरण करण्यात आले. या प्रसंगी मुलांचे ७८ व मुलींचे ५० डोस देण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी नगरसेविका प्रियंकाताई धनंजय माने, डॉ.सुदर्शन वडघने, डॉ.सोनाली वाघ, डॉ.ऐश्वर्या झोपे, डॉ.ऐश्वर्या कसबे, डॉ. तेजस केकाण, पंडितराव ढिकले, आत्माराम वाघमारे, प्रदीप हाटकर, दत्तात्रेय सापनर, राहुल गायकवाड व परिसरातील नागरिक उपस्थित होते.