ईद-ए मिलाद पर्यंत ‘या’ शहरात पोलिस बंदोबस्त कायम

मालेगाव:- गणेश उत्सव काळामध्ये मालेगाव शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नाशिक जिल्हा पोलिस प्रशासनाकडून(nashik district police force) गस्तीपथकाचे नियुक्ती केली आहे. राज्यभरातील घडामोडी सामाजिक आंदोलने जातीय तणाव घटनांच्या पार्श्वभूमीवर एक खबरदारी घेतली जात आहे.

यंदाच्या गणेशोत्सवाच्या काळात दरवर्षीच्या तुलनेत वाढीव पोलीस बंदोबस्त (police bandobast)तैनात करण्यात आला आहे. राज्य राखीव पोलीस दल आणि दंगा नियंत्रण पथकाच्या तीन कंपन्यांसह ३०० पोलीस कर्मचारी आणि गृह रक्षक दलाचे ५५० जवानांचा खडा पहारा नाशिक जिल्ह्यात सुरू आहे. गणेश विसर्जन आणि त्यापाठोपाठ लगेचच दुसऱ्या दिवशी ईद आसल्यामुळे मिरवणुका निघणार आहे.

त्यामुळे हा बंदोबस्त सप्टेंबर च्या शेवट पर्यंत कायम ठेवला जाणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. नाशिक शहर व तालुक्यात ४६८ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून गणरायाची स्थापना करण्यात आली आहे. पोलिसांनी संवेदनशील भागामध्ये ११९ मंडळांना बंदोबस्त पुरविला आहे. येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज संस्था महानगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. (mnc election 2024)अनेक इच्छुकांनी जनसंपर्क वाढवण्यासाठी गणेश उत्सवाची संधी साधली आहे.

कुणाच्या व्यक्तिगत किंवा राजकीय स्वार्थापोटी कायदा व सुव्यावस्थेला बाधा निर्माण होऊ नये याची पोलीस प्रशासन दक्षता घेत आहे. महत्त्वाच्या गणेश मंडळांसह संवेदनशील भागामध्ये अगोदरच सशस्त्र बंदोबस्त तैनात आहे. मालेगाव शहर आणि कॅम्प विभाग विभागानुसार बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.

असा आहे पोलिस बंदोबस्त

पोलीस उपाधीक्षक दोन
पोलीस निरीक्षक नऊ
सहाय्यक निरीक्षक उपनिरीक्षक 27
पुरुष पोलीस कर्मचारी 220
महिला पोलीस कर्मचारी 58
होमगार्ड जवान 540
राज्य राखीव पोलीस बल कंपनी एक
गंगा नियंत्रण पथक दोन
गणेश विसर्जन व ईद मिलाद(eid e- milad) (ganesh festival) च्या मिरवणुका निर्धारित वेळेत व शांततेत पूर्ण होतील असा विश्वास अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी व्यक्त केला आहे.