गैरप्रकार टाळण्यासाठी पोलीस भरती ‘या’ खात्यामार्फत होणार

नाशिक । प्रतिनिधी

आरोग्य विभाग (Health Department), म्हाडा (MHADA), शिक्षण विभागातील (Education Department) पेपरफुटी या पाठोपाठ मुंबईतील पोलीस भरती (Police Bharti) प्रक्रियेत गैरप्रकार होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी पोलीस खात्यामार्फतच हि परीक्षा घेतली जाणार असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांनी व्यक्त केले.

विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter Session of the Legislature) सध्या सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक परीक्षांत गैरप्रकार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आरोग्य परीक्षेपासून सुरु झालेले प्रकरण म्हाडा, टीईटी (TET), पोलीस भरती आदींपर्यंत येऊन पोहचले आहे. त्यामुळे लाखो तरुणांची पोलीस होण्याची अपेक्षा असलेल्या पोलीस भरती परीक्षेत असे गैरप्रकार टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे.

दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार विधिमंडळात म्हणाले कि, यापुढे शासकीय खात्यातील भरती ही टीसीएस (TCS), एमकेसीएल (MKCL) आणि आयबीपीएस (IBPS) या प्रतिष्ठित आणि अनुभवी संस्थांच्या माध्यमातून करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याचबरोबर पोलीस भरती मात्र पूर्वीप्रमाणेच पोलीस खात्यामार्फतच (Police Department) पारदर्शक पद्धतीने घेण्यात येणार आहे.

म्हाडा, आरोग्य विभागाच्या पेपर फुटीची सरकारने गंभीर दाखल घेतली असून त्याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली असून पुणे पोलीस (Pune Police) या प्रकरणाच्या शेवटपर्यंत जाणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.