नाशिकमधील राजकारणी गुंडांना आश्रय देतात!

नाशिक । प्रतिनिधी
नाशिक शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील गुन्हेगारीच प्रमाण अधिक वाढत चालल असल्याचे सांगत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पोलिसांच्या कामकाजावरच प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे.

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे काल नाशकात होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नुकतच काल इगतपुरी शहरात पूर्ववैमनस्यातून दोन गटांत तुफान हाणामारी झाली आहे. या वादातून एकाचा खून झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. नागरीक प्रचंड दहशतीखाली आहेत. यावरून प्रवीण दरेकर यांनी आसूड ओढत येथील सत्तेमध्ये असणारे राजकारणीच गुन्हेगारांना आश्रय देत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

ते म्हणाले कि, नाशिकमधील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यात पोलिसांना अपयश येत असून गुन्हेगारीकरण वाढत चालले आहे. येथील गुंड मोकाट असून सत्तेमधील राजकारणी गुंडांना आश्रय असल्याचा सणसणीत आरोप त्यांनी यावेळी केला. दिवसेंदिवस नाशिकमधील गुन्हेगारी वाढते आहे, पोलिसांना हि गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी सहकार्य अपेक्षित असताना राजकारणीच गुंडाना पोसत असल्याने गुन्हेगारी कमी कशी होणार असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

तर एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाचा लढा अद्यापही सुरूच आहे. तत्पूर्वी एस टी कर्मचारी माझ्याकडे आले होते. त्यावेळी ते म्हटले की मधला मार्ग काढा. त्यावेळी अनेक उपाय सांगितले मात्र सरकारला ते रुचले नाही. अशातच आम्ही आंदोलनातून बाहेर झालो मात्र त्यांना एसटी कर्मचाऱ्यांना समर्थन राहील,आज आणि उद्या ही.. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून त्यांनाही सातव वेतन लागू लागू करावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.