नाशिक । प्रतिनिधी
भद्रकाली येथील तलावडी भागात एक जुना वाडा कोसळल्याची घटना घडली. हि घटना आज सकाळी शनिवारी अकरा वाजता घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सदर वाडा हा पिंपळ चौकातील संजय परदेशी यांच्या मालकीचा असून त्यांच्या जुन्या वाड्याची भिंत कोसळली. यावेळी वाड्याच्या मागील राहणाऱ्या परवेज मेमन यांच्या भाडेकरूंच्या घरांवर कोसळली. यामध्ये चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले आहे. जखमींमध्ये एक महिला आणि तीन नागरिकअसून एक तीन महिन्याचे बालक बालबाल बचावले आहे. जखमींमध्ये रिजवान अब्दुल, रहमान पठान, अजित सय्यद, प्रमोद दोरगे, सलीम शेख, अत्तर व इतर कारागीर होते.
घटनेची माहिती कळताच भद्रकाली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता पवार आणि त्यांची बीट मार्शल टीम व पथक पोलीस नाईक कोळी पोलीस नाईक काटे, बीट मार्शल चे हसे, बीट अंमलदार समाधान जाधव व सांधे व इतर उपस्थित होते.
तसेच शिंगाडा तलाव अग्निशामक दलाचे केटी पाटील, डीपी दराडे, भास्कर पवार, वाहन चालक देटके आदींनी घटनास्थळी वेळेवर पोहोचून मदतकार्य सुरू केले. अधिक तपास भद्रकाली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता पवार करत आहे.