Home » गुंगीचे औषध देऊन महिलेवर दोन वर्षे अत्याचार

गुंगीचे औषध देऊन महिलेवर दोन वर्षे अत्याचार

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी

एका क्लासेसच्या संचालकाने कामानिमित्त भेटायला आलेल्या महिलेला गुंगीचे औषध देत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नाशकात घडली आहे. अत्याचार करून महिलेचे अश्लील फोटो, व्हिडिओ काढत ते व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार अत्याचार केला असल्याची फिर्याद संबंधित महिलेने गंगापूर पोलिस ठाण्यात दिली आहे. हा प्रकार मे २०१९ ते जुलै २०२१ २ या कालावधीत नाशिक शहरातील विविध भागात घडला.

ललीत निकम, जयेश वाघ, नेहा निकम, ज्योती वाघ अशी संशयित आरोपींची नावे आहेत. यामधील एक ललित निकम यास अटक करण्यात आली आहे. संशयित ललित निकम हे एन. ललीत मेकअप क्लासेस चालवितात. निकम यांनी फिर्यादी यांना कामानिमित्त हॉटेल पंचम जवळ बोलवले. यावेळी फिर्यादी संशयितांच्या स्वीफ्ट डिझायर गाडीत बसलेली असतांना त्यांना कोल्ड्रिंक्स मधून गुंगीचे औषध देण्यात आले. त्यानंतर कॉलेज रोडवरील आर्चिस गॅलरीच्या मागे असलेल्या पराग अपार्टमेन्ट मधील तळ मजल्यावर असलेल्या सलुनमध्ये नेत त्यांच्यावर अत्याचार केला.

हा प्रकार मे २०१९ ते जुलै २०२१ या काळात वेळोवेळी झाल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे. तसेच अश्लील फोट, व्हिडीओ काढून ते फिर्यादीच्या पतीस पाठवण्याची धमकी देत वेळोवेळी अत्याचार केला. यातून मे २०२१ मध्ये गर्भधारणा झाल्याने संशयितांनी सदर गर्भ फिर्यादी यांच्या पतीचा असल्याचे सांगून वाघ यांच्या वाघ हॉस्पीटल गंजमाळ येथे गर्भपात केला असलयाचे तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित ललित निकम यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास गंगापूर पोलीस करीत आहेत.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!