नाशिक । प्रतिनिधी
चार राज्यात भाजपने विजयी संपादन केला असून यात नरेंद्र मोदी यांचा हात आहे. वेगवेगळ्या योजना मोदी सरकार ने आणल्या म्हणून भाजपचा विजय झाला, तर उत्तर प्रदेश मध्ये योगी आदित्य नाथ यांनी गुंडाराज संपवला, केलेल्या विकासामुळे उत्तर प्रदेश मध्ये भाजप विजयी झाल्याची प्रतिक्रिया खासदार रामदास आठवले यांनी दिली.
काल पाच राज्याच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. यामध्ये भाजपने चार राज्यात घवघवीत यश संपादन करून विजयी घौडदौड सुरूच ठेवली. यामुळे देशभरात विजयोत्सव साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर खासदार रामदास आठवले या निकालावर पहिली प्रतिक्रिया दिली. चार राज्यात भाजपने विजयी संपादन केला असून यात नरेंद्र मोदी यांचा हात आहे. वेगवेगळ्या योजना मोदी सरकार ने आणल्या म्हणून भाजपचा विजय झाला, तर उत्तर प्रदेश मध्ये योगी आदित्य नाथ यांनी गुंडाराज संपवला, केलेल्या विकासामुळे उत्तर प्रदेश मध्ये भाजप विजयी झाल्याची प्रतिक्रिया खासदार रामदास आठवले यांनी दिली.
तर पंजाबमध्ये आपने मिळवलेल्या विजयावर आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन त्यांनी यावेळी केले. पंजाब मध्ये लोकशाहीचा कल आम्हाला मान्य असून ही निवडणूक म्हणजे २०२४ च्या निवडणूकीची ट्रायल होती. त्यामुळे २०२४ मध्ये ४०० च्या वर जागा मिळतील, असा कयास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पंजाब मधील पराभवावर ते म्हणाले कि मोदींनी शेतकरी कायदे मागे घेतले, पंजाब मध्ये भाजपची ताकद कमी पडली, तर लोकांना कॉग्रेस नको होती. यामुळे आप ने या ठिकाणी बाजी मारली. पुढच्या वेळी आप ला सत्तेतून बाहेर करू असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
कॉग्रेससंदर्भात बोलताना ते म्हणाले कि, राहुल गांधी भाजपला विरोध करतात, त्याच नुकसान होत आहे. यानिवडणुकांत प्रियांका गांधी यांची जादू पण उत्तर प्रदेश मध्ये चालली नाही. त्यामुळे निकालांच्या आकड्यावरून लक्षात आलेच कि, कॉग्रेस पक्ष आता दिसेनासा झाला आहे. त्यातच काँग्रेस पक्षाला नेतृत्व मिळणे अशक्य आहे, त्यामुळे काँग्रेसची अवस्था दयनीय झाली. राहुल गांधी यांनी ऊठसूट नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करू नये, यामुळे भाजपचा फायदा होत असून राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला यश मिळणे अशक्य असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेनेवर बोलताना ते म्हणाले कि, शिवसेनेची अवस्था कॉग्रेस सारखी दयनीय झाली असून लोकसभेत ३ ते ४ जागा निवडून येतील की नाही, याबद्दल शंका वाटते. म्हणून भाजप सेनेने एकत्र यावे, अडीच अडीच वर्षाच्या समीकरणाला एकत्र यावे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत किंवा सेनेचे खासदार भेटले तर त्यांना मी सूचना केल्या आहेत, मात्र तसे घडले नाही.