मुंबईत जागा नाकारली, मुंबई नेमकी कोणाची?

मुंबई :- राज्यसरकार अनेक गृहयोजना (home scheme maharashtra goverment)राबवत आहे. परंतु त्या योजना कागदावरच आहेत असा प्रश्न आता निर्माण जल आहे. मुंबई शहरातील मुलुंड मध्ये मराठी महिलेला जागा नाकारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तृप्ती देवरुखकर आस घर नाकारलेल्या महिलेच नाव आहे. तृप्ती देवरुखकर ह्या बुधवारी त्यांच्या व्यवसायासाठी (business palce in mumbai)मुलुंड परिसरात जागा शोधत होत्या.

यावेळी ऑनलाइन जागेची माहिती मिळाल्यानंतर त्या मुलुंडच्या शिवसेना सोसायटीत गेल्या तिथे सेक्रेटरी सोबत संवाद साधत आसताना त्यांनी तुम्ही महाराष्ट्रीयन आहात का? असे तृप्ती यांना विचारले त्यावर त्या “हो” बोलल्यानंतर आम्ही महाराष्ट्रीयन लोकांना जागा देत नाही. असं सोसायटीने सांगितले त्यावरून हा वाद झाला. त्यात तृप्ती आणि त्यांच्या पतीला मारहाण, धक्काबुक्की आणि त्यांच्यासोबत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर मनसेने याची दखल घेत तातडीने शिवसदन सोसायटीला भेट दिली. त्यानंतर मनसे स्टाईलने संबंधितांना समज देत महिलेची मराठी भाषेत माफी मागण्यास भाग पाडले. आता या घटनेची राज्य महिला आयोगाने दखल घेत सहकार आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे, तसेच प्रधान सचिव, गृहनिर्माण विभाग महाराष्ट्र राज्य,मंत्रालय मुंबई यांना चौकशी करून अहवाल मंगविण्यात आला आहे.तसेच या प्रकरणातील महिलेला दुय्यम वागणूक देऊन मारहाण करून त्रास दिल्या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश संबंधित पोलिस ठाण्याला देण्यात आले आहे.

मराठी महाराष्ट्राची मातृभाषा आहे गेल्या दोन दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील दुकानावरील पाट्या मराठी भाषेतच(marathi language in board in shop) आसयला हवी अशी तंबी दिली होती. प्रत्येक राज्याला आपल्या मातृभाषेविषयी अभिमान आसतो मातृभाषेला आधी प्राधान्य दिले जाते. महाराष्ट्रात व्यापार करायचा असेल तर दुकानावरील पाट्या ह्या मराठी भाषेतच असायला हव्यात आस सांगून येणाऱ्या दोन महिन्यात दुकानवरील पाट्या मराठी भाषेत करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे.

एकीकडे सर्वोच्च न्यायालयाचे आदेशाचे पालन करायला सुरुवात करत आसताना दुसरीकडे मुलुंड (mulund mumbai)मध्ये मराठी भाषिकांना घर नाकारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नेहमीच म्हंटल जात की मुंबई महाराष्ट्राची आहे. मुंबई मराठी माणसांची आहे. परंतु मराठी माणसाला त्याच्या हक्काच्या जागेत जागा नाकरली जात असेल तर नेमक मुंबई कोणाची? मुंबईत नेमकी चलती कोणाची? असे एक ना अनेक प्रश्न आता विचारले जात आहे.