सिन्नर येथे कुटुंबाला मारहाण करीत टाकला दरोडा

सिन्नर । प्रतिनिधी
सिन्नर तालुक्यातील मलढोन येथील वाल्मिक सरोदे यांच्या घरावर मंगळवार (दि. २३) मध्यरात्री दोनच्या सुमारास दरोडेखोरानी दरोडा टाकून लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. यामध्ये दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत वाल्मिक सरोदे हे जखमी झाले आहेत. या दरोड्यामुळे मलढोन परिसरात घबराट निर्माण झाली आहे.

मलढोण येथील कदम कुटुंबाला मारहाण करून दरोडेखोरांनी हा दरोडा टाकला आहे. यावेळी दरोडेखोरांनी दगड विटांचा मारा करून घरात प्रवेश केला. घरात प्रवेश करून काचेची बाटली वाल्मिक सरोदे यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. घटनेची माहिती मिळताच वावी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र अंधाराचा फायदा घेत दरोडेखोर पसार झाले.

दरम्यान घटनेच्या उशीरानंतरपोलिसांच्या हाती एक दरोडेखोर सापडल्याची माहिती मिळाली असून ऋषिकेश राठोड (रुई,ता, कोपरगाव) असे या संशयिताचे नाव आहे. पुढील तपास वावी पोलीस करीत आहेत.